Video

Dombivli Shocking : खेळता खेळता तोल गेला, ५ वर्षीय मुलगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडली; मनाला चटका लावणारा अंत

Dombivli Shocking News : ५ वर्षीय मुलीचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाच वर्षीय मुलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

डोंबिवलीत एक दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीतील दर्शना पाम्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ग्रीन लावले नसल्याने ५ वर्षीय मुलगी पडल्याची माहिती मिळत आहे.

इमारतीवरून पडून मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परी छोटूलाल बिंद असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. नालासोपारा येथे राहणारे छोटूलाल हे मुलीला घेऊन डोंबिवलीत राहणाऱ्या भावोजीकडे पूजेकरिता आले होते. इमारतीच्या गॅलरीमध्ये खेळताना ही दुर्घटना घडली. डोंबिवलीच्या दावडी परिसरातील या घटनेने या मुलीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT