Sanjay Raut SaamTv
Video

Sanjay Raut News : .. तेव्हा तुमची तोंडं शिवलेली होती का? राऊतांचा रावसाहेब दानवेंवर पलटवार

Sanjay Raut Statement On BJP : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून महायुती आणि भाजप सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

Saam Tv

जो शब्द तुम्ही उध्दव ठाकरेंना दिलेला आहे तो तुम्ही पाळा. उध्दव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे, असं रावसाहेब दानवेंनी अमित शहा यांना सांगायला हवं होतं. तेव्हा तुमची तोंडं शिवलेली होती का? असा प्रश्न शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी राऊत यांनी पत्रकार परिषदेतून महायुती सरकार आणि भाजपवर टीका केली. त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही त्यांना नकोसे झालो होता. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि भाजप कधी कोणत्या विषयावर उड्या मारतील ते सांगता येत नाही, असा टोला लगावत राऊत यांनी रावसाहेब दानवेंना प्रत्यूत्तर दिलं आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, जगभरातील सर्व हिंदू हे केवळ भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या राजकीय स्वार्थामुळे संकटात आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींचं निवडणुका जिंकण्याच्या धोरणामुळे ज्या-ज्या भागात हिंदू मोठ्या प्रमाणात राहतात, तेथे हिंदूंवर हल्ले होत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. नेपाळ, कॅनडा आणि बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्याची ताकद मोदी यांच्या सरकारमध्ये नाही. केवळ दंगे घडवून मुस्लिम समजला टार्गेट करायचं एवढच ते करतात. त्याचा विपरीत परिणाम आज हिंदूंवर होत आहे, असा घणाघात यावेळी बोलताना त्यांनी केला.

दरम्यान, गृहमंत्रीपदावरून राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. शिंदेंना गृहमंत्रिपद केवळ पोलीसांचे सलाम हवेत म्हणून पाहिजे. शिंदेंनी केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या अंगावर चढून जाण्यासाठी सुद्धा ते पोलीस यंत्रणेचा वापर करू शकतात, असं राऊत यांनी म्हंटलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT