Sanjay Derkar SaamTv
Video

Sanjay Derkar News : 10 वर्षात मतदारसंघात काम झालं नाही; ठाकरेंचे नवनिर्वाचित आमदार देरकर यांची प्रतिक्रिया

Vani Assembly Constituency : यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर त्यांनी साम टीव्हीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

वणीचे मतदार पूर्वीच्या आमदारांच्या कामाने नाराज होते. त्यामुळे त्यांनी मला संधी दिली आहे. मी इथल्या जनतेसाठी नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल असं वणीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी म्हंटलं आहे. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बापूराव बोडकुरवार उभे होते. त्यांच्या विजयानंतर आज त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेऊन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने मला तिकीट दिलं. मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याची जबाबदारी इथल्या जनतेने आता माझ्यावर टाकली आहे. गेल्या दहा वर्षात इथल्या आमदारांनी कोणतीही कामं केलेली नाही. जनतेचा एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही. राज्यात आणि केंद्रात आमचा विरोधी पक्ष जरी सत्तेवर असला तरी मी इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी नक्कीच आवाज उठवेल, असंही देरकर यांनी म्हंटलं आहे. संजय देरकर यांच्या पत्नी यांनी देखील यावेळी बोलताना वणीच्या मतदारांचे आभार व्यक्त करत संजय देरकर हे मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Ishan Kishan, IPL Mega Auction: काव्या मारणने डाव टाकला! मुंबईच्या विश्वासू खेळाडूला घेतलं संघात

SCROLL FOR NEXT