Pimpri Chinchwad News SaamTv
Video

Shivsena UBT News : पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, पहा काय आहे प्रकरण | Video

Pimpri Chinchvad News : शिवसेना ठाकरे गटाने पिंपरी-चिंचवडमध्ये आज पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जोरदार घोषणाबाजी आणि राडा झाला आहे.

Saam Tv

पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील विधानसभा निवडणूक बंडखोरी टाळण्यासाठी आज शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले आणि संजोग वाघेरे यांनी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एका बँकवेट हॉलमध्ये घेतली होती. या बँकवेट हॉलमध्ये भोसरी विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकारी बैठकीत सुरू असताना जोरदार घोषणाबाजी आणि राडा झाला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे बंडखोर पदाधिकारी रवी लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. तर पिंपरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. आता सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर रवी लांडगे आणि गौतम चाबुकस्वार आपला अर्ज मागे घेऊन बंडखोरी टाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील विधानसभा निवडणूक बंडखोरी टाळण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मतदारसंघात झालेली बंडखोरी मागे घेण्याबाबत चर्चा सुरु होती. यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी नाराज पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT