Sanjay Shirsat News SaamTv
Video

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिरसाट यांचा मोठा खुलासा

Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

Saam Tv

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, अशी ऑफर भाजपने दिली होती. पण त्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय वर्तुळात ठाकरेंच्या भूमिकेवर चर्चा रंगली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांना परत घेऊ पण निघून गेलेल्या आमदारांसाठी परतीचे दोर कापले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रवेश सोहळ्यात म्हंटलं होतं. त्यावर देखील संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. परतीचे दोर कापायला तुमच्याकडे कुणी आले तर पाहिजे. तुमच्याकडे यायला कोण तयार आहे. डुबणाऱ्या पक्षाकडे कुणीही जात नाही. नगरसेवक किंवा कार्यकर्ता आला असेल, तो देखील उमेदवारीचे तिकीट घेऊन आला असेल. त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला तुमच्या दरवाजा किंवा पक्षात यायचं नाही, असंही शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT