Sanjay Raut saam tv
Video

Ajit Pawar Case: 'लहान भावाचा काटा काढण्यात मोठ्या भावाचा हात', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Sanjay Raut Criticized BJP: अजित पवार अपघात प्रकरणावर गुन्हा दाखल करत नाहीत यावरून संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. 'लहान भावाचा काटा काढण्यात मोठ्या भावाचा हात', असे खळबळजनक विधान त्यांनी केले.

Priya More

दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून ठाकरेसनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. 'लहान भावाचा काटा काढण्यात मोठ्या भावाचा हात आहे का?', असा खळबळजनक सवाल ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मित्राच्या मृत्यूबाबत गुन्हा का दाखल होत नाही?, असा प्रश्न विचारत त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. इतर प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल होतात, मग या प्रकरणात विलंब का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल व्हावी हीच मागणी हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि आकाश मोरे यांची आहे. ही मागणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी करावी. मुख्यमंत्री म्हणतात खोलवर जाऊन तपास करू पण एफआयआर दाखल करत नाहीत. या मागण्याचा विचार केला तर महाराष्ट्रवर उपकार होतील. एफआयआर दाखल करा तुम्ही का पळताय? जिवाभावाचा मित्र तुम्ही अजित पवार यांना म्हणता तर मग चौकशी करा. मोठा भाऊ तुम्ही स्वतः ला म्हणता तर लहान भावाच्या अपघाताची चौकशी करा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत नामांकांचा पाऊस

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

SCROLL FOR NEXT