vaibhav Naik booked for vandalized PWD Office at Malvan in Konkan SAAM TV
Video

Vaibhav Naik Booked | PWD कार्यालय फोडणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा, VIDEO

Vaibhav Naik Latest News : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर संतापलेल्या आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

सिंधुदुर्ग :

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवण येथील कार्यालयात तोडफोड केली होती. या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यात ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ता मंदार केणी यांचाही समावेश आहे.

दुसरीकडे, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार टीका होऊ लागली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय फोडले ही जनभावना होती. त्यांना ही घटना कशी घडली हे भेटून सांगेन, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

वैभव नाईक यांनीही पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करतात. महाराष्ट्रातील जनता त्यांची हंडी फोडल्याशिवाय राहणार नाही, असं नाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT