Thackeray vs Rane Rada in Rajot Fort Saam TV
Video

Thackeray vs Rane : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे-राणे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO

Thackeray vs Rane Rada in Rajot Fort : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

Satish Daud

सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. वाद इतका वाढला की, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुफान मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय.

सध्या पोलीस दोन्ही गटातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मालवण बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आमदार वैभव नाईक हे राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. त्याचवेळी निलेश राणे यांच्यासह त्यांचे समर्थक देखील किल्ल्यावर आले. यावेळी राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.

त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT