Sanjay Raut Claim On Devendra Fadanvis Saam Tv
Video

VIDEO : मोदी-शहा गुजरातचे व्यापारी, त्यांनी शिवसेना ओरबाडून घेतली; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News Today : नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरातचे व्यापारी असून त्यांनी सत्तेच्या आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ओरबाडून घेतली, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Satish Daud

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरातचे व्यापारी असून त्यांनी सत्तेच्या आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ओरबाडून घेतली, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी लोकभावना आहे, असंही राऊतांनी म्हटलंय.

संजय राऊतांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. गेल्या अडीच वर्षात आणि त्याआधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी ३-४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. आमच्या शिवसेनेतून नगरसेवकांपासून शाखाप्रमुखांपर्यंत सगळे आपल्या गटात ओढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हे पैसे खर्च केले, असंही राऊत म्हणाले.

मोदी-शहा गुजरातचे व्यापारी असून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही. ठाकरे यांचे यांचे नेतृत्व संपवता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फॅन्स क्लबच चालतो. औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला. आमच्याकडे शिवाजी महाराज जन्माला आले, अशी टीकाही राऊतांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT