raigad news  saam tv
Video

Shiv Rajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिनानिमित रायगडावर 3 ते 4 लाख शिवभक्त; पाहा व्हिडिओ

Grand Shiv Rajyabhishek Day : आजचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत खास होता. आज अखंड देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजयभिषेक दिन होता.

Omkar Sonawane

रायगड: आजचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत खास होता. आज अखंड देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन होता. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. यावेळी राज्यभरातून शिवप्रेमी हे रायगडावर दाखल झाले होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर जवळपास 3-4 लाख शिवभक्त दाखल झाले होते.

यावेळी शिवभक्तांचा उत्साह हा शिगेला पोहोचला होता. तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा हस्ते शिवप्रतिमेचे विधीवत पुजन या वेळी करण्यात आले. उत्सव मूर्ती आणि त्या नंतर मेघडंबरीतील शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. राजपुरोहितांचे मंत्रघोष आणि शाहिरीच्या साथीने हा सोहळा पार पडला. यावेळी रायगड पोलिस दलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT