Shrinivas Vanga SaamTv
Video

Shrinivas Vanga News : मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतलेले वनगा पुन्हा अज्ञातवासात; पत्नीने केला मोठा खुलासा | Video

Palghar News : तिकीट नाकारल्याने 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांनी मध्यरात्री आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला आहे. त्यानंतर ते पुन्हा अज्ञातवासात गेले आहेत. याबद्दल त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

तिकीट नाकारल्याने नाराज होऊन मागील 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा हे गेल्या ३६ तास नॉट रीचेबल होते. ते कुठे गेले आहेत याबाबत कुटुंबियांसह कोणालाच माहिती नव्हती. मात्र काळ मध्यरात्री त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा केली. त्यानंतर ते पुन्हा आपल्या मित्रांसोबत बाहेर निघून गेले. यावेळी वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी श्रीनिवास वनगा हे सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने ते घरी थांबले नसल्याच सांगत आणखीन चार ते पाच दिवसांनी ते सुखरूप घरी परततील अशी माहिती दिली आहे. तर श्रीनिवास वनगा यांच्यासह आम्ही सध्या प्रसार माध्यमांसमोर बोलण्याच्या मानसिकतेत नसल्याच सांगत आमदारांची मनस्थिती ठीक झाल्यावर ते स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येतील, त्यामुळे प्रसार माध्यमांनी देखील आम्हाला आत थोडी प्रायव्हसी द्यावी अशी विनंती सुमन वनगा यांनी केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT