Devotees waiting for meals at Shirdi Sai Prasadalaya after the temple trust changed the menu due to a gas shortage. Saam Tv
Video

दर्शनासाठी तासनतास रांग.., भुकेलेल्या साई भक्तांवर उपासमारीची वेळ; गॅस टंचाईमुळे प्रसादालयातून डाळ-भात वगळला|VIDEO

Shirdi Sai Prasadalaya Menu Change Due To Gas Shortage: गॅस टंचाईमुळे शिर्डी साई प्रसादालयातील भोजन मेन्यूत मोठा बदल करण्यात आला आहे. भाविकांना मिळणाऱ्या डाळ-भाताऐवजी आता खिचडी, भाजी आणि चपाती दिली जाणार आहे.

Omkar Sonawane

इराण-इस्रायल अमेरिका युद्धामुळे संपूर्ण देशात गॅसची आणीबाणी लागू झाल्याचे सदृश्य आहे. अनेक हॉटेल, खानावळी या बंद झाल्या असून आता युद्धाचा परिणाम हा थेट किचनमध्ये म्हणजेच भारतीयांवर झाला आहे. अशातच शिर्डी येथील साई प्रसादलयात मेनूमध्ये बदल करण्यात आल्याने साई भक्तावर उपासमारीची वेळ आली आहे. देशभरातून भक्तगण हे शिर्डीमध्ये येत असतात. दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहून भुकेलेले असतात आणि अनेक भाविक हे चालत ही येतात. मात्र गॅस टंचाईमुळे साई संस्थेने भोजनातून डाळ-भात वगळला असून आता फक्त एक भाजी, चपाती आणि भाताची खिचडी मिळणार आहे. गॅस काटकसरीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे साई भक्तांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड

कोणतीही मेहनत न करता वजन होईल कमी! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' भन्नाट घरगुती उपाय

Monsoon Update : मान्सून कोकणात आला, पण राज्यभर पोहोचायला अडथळा; सरकारनं दिला महत्त्वाचा इशारा

Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कधी मिळतील? तारखेबाबत आली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT