Shirdi Saam TV
Video

Shirdi : गुरुपौर्णिमेचा उत्साह; गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव, शिर्डी, अक्कलकोटमध्ये अलोट गर्दी | VIDEO

Guru Purnima 2025 : देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे रवाना झाले आहेत. मंदिर परिसरात विशेष सजावट, भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव, शिर्डी, अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. देशभरातून लाखो साईभक्त शिर्डीकडे येऊन साईबाबांच्या चरणी माथा टेकत आहेत. साईदर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्याचं चित्र शिर्डी परिसरात पाहायला मिळत आहे.भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे.

मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजन व आरती आयोजित करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे. रोषणाई, पताका, आणि पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण शिर्डी भक्तिमय वातावरणात न्हालेली दिसत आहे.

शिर्डीत आज संपूर्ण दिवस साईनामाच्या जयघोषात भक्तिरसात न्हालेला आहे. विविध राज्यांमधून आलेल्या भक्तांनी 'साईराम' चा गजर करत मंदिर परिसर गजरमय केला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी लीन झालेली शिर्डी, भक्तीच्या तेजात न्हालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

Ukraine Russia War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; रेडिएशनचा धोका,अण्वस्त्रयुद्धाची भीती

Aadhaar-Pan Card Update: आधार-पॅनमध्ये नाव, जन्मतारीख वेगवेगळी; कामं रखडतील, घरबसल्या करा दुरुस्त, सोप्या टिप्स

Shocking : ७ मुलांची आई भाच्याच्या प्रेमात झाली खुळी; नवऱ्याकडून ३ लाख घेऊन पळाली, दुसऱ्या गावात संसारही थाटला

SCROLL FOR NEXT