Maratha community members from Shirdi preparing chutney-bhakri shidori for protesters in Mumbai. Saam Tv
Video

Maratha Protest: साईनगरी शिर्डीतून मराठा आंदोलकांसाठी चटणी-भाकरीची शिदोरी | VIDEO

Shirdi Maratha Community Sends Chutney Bhakri: शिर्डी येथील सकल मराठा समाज बांधवांकडून मुंबईतील आंदोलनकर्त्या मराठा बांधवांसाठी घराघरातून चटणी-भाकरीची शिदोरी पाठवण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मुंबईत आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांसाठी साईबाबांच्या शिर्डीतून चटणी भाकरीची शिदोरी रवाना करण्यात आली आहे. शिर्डी शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने चटणी भाकरी पोहच करण्यात येत असून घराघरातून चटणी भाकरी जमा करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मुंबईत आंदोलन करणाऱ्यांची खाण्यापिण्याची अडचण निर्माण झाली आहे.

त्यामुळे राज्यभरातील गावागावातून त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शिर्डी शहर वासियांच्यावतीने मुंबईतील मराठा समाज बांधवांना जेवणासाठी शिदोरी पाठवली जातेय. शंभूराजे प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने चटणी भाकरीची शिदोरी मुंबईला रवाना केली जात असून शेकडो समाज बांधवांनी पाणी चटणी भाकरी आंदोलकांसाठी पाठवली आहे. शिर्डी शहरात देखील सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने आमरण उपोषण केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

Vitamin B12: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, आताच करा आहारात 'हा' बदल

Ankita Walawalkar: 'स्पायवर मस्करी करून रिल बनवणं...'; अंकिता वालावलकर धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवर संतापली, म्हणाली...

Mithila Palkar: हिरवी चोळी अन् दिसायला गोरी;मिथिलाचं नवं रुप प्रेमात पडाल

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

SCROLL FOR NEXT