Sanjay Shirsat SaamTv
Video

MLA Sanjay Shirsat : मुख्यमंत्री शिंदेच होणार? संजय शिरसाट यांचा मोठा खुलासा

Maharashtra CM Seat : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Saam Tv

एकनाथ शिंदे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असा दावा शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, असं सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांना देखील माहीत होतं, म्हणून शिंदेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल वेगवान हालचाली सुरू आहेत. प्रत्येक कार्यकर्ता, आमदार आमचाच मुख्यमंत्री व्हावा असं मागणी करत आहे. त्यात आमदार शिरसाट यांनी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं आहे. 'विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवायची ठरली होती. वरिष्ठ पातळीवर कोणता करार झाला हे मला माहिती नाही. पण सर्वसामान्य किंवा सर्व युतीच्या कार्यकर्त्यांना हे माहीत होतं, की निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. तर तेच मुख्यमंत्री होतील असं मत होतं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत. हे काही गुपित नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होतील असं शिवसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योग, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

SCROLL FOR NEXT