MAHENDRA DALVI CONTROVERSIAL REMARKS ON SUNIL TATKARE saam tv
Video

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Tatkare Should Have... Mahendra Dalvi Controversial Statement: रायगडमधील माणगाव येथे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या विधानामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पाहा संपूर्ण व्हिडिओ.

Omkar Sonawane

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील प्रवेश सोहळ्यात शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची जीभ घसरल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल बोलताना दळवींनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माणगावमधील प्रवेश सोहळ्यात बोलताना महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी तटकरेंचा उल्लेख करताना अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला.

तटकरे असा अवलिया आहे, जन्माला आला तेव्हा गेला असता तर वारभर कपड्यात गेला असता, आता सहा मीटर कपडा लागेल, असा वादग्रस्त उल्लेख दळवींनी केला. यावेळी बोलताना दळवींनी, 'आता माझी भाषा संपली, शेवटच्या टोकाचं बोलतोय, असंही म्हटलं. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीत दरार नाही, तर दरी पडली आहे. ही दरी कधीही मिटणार नाही, असं विधान त्यांनी केलं. महेंद्र दळवी यांच्या या वक्तव्यामुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT