ऐरोलीत शिंदेसेनेच्या उमेदवारानं मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप Saam tv
Video

शिंदेंच्या शिवसेना उमेदवारानं मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप; पोलिसांशीही घातली हुज्जत

Navi Mumbai News : नवी मुंबईतील ऐरोलीत शिंदेसेनेचा उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांशीही उमेदवारानं हुज्जत घातल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Nandkumar Joshi

विकास मिरगणे, नवी मुंबई, साम टीव्ही

नवी मुंबईतील ऐरोली येथील माजी नगरसेवक आणि शिंदे गटाचे उमेदवार एम के मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी आणि करण मढवी यांनी ऐरोली सेक्टर १६ येथील एका मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्या मंडळातील युवकांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ऐरोलीतील एका मंडळाच्या मुलांना शिवीगाळ आणि धमकी देऊन त्यांना मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. याबाबत पीडित तरुणांनी पोलिसांत तक्रार केली. रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी घटनेबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता, मढवी कुटुंबीयांनी त्यांच्याशीही हुज्जत घातली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. रबाळे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलंय.

घणसोलीत भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला काही तास उरले असतानाच, राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडलीय. त्यावेळी तिथं असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

Palghar Crime: जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT