Supporters of both groups face off as police intervene during the Raghai Temple gate inauguration in Dombivli. Saam Tv
Video

मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावरून शिंदेसेना–भाजपात राडा|VIDEO

Shinde Sena And BJP Clashed At Dombivli: डोंबिवलीतील रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी शिंदेसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. नजरकैदेत ठेवलेल्या नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने परिस्थिती चिघळली.

Omkar Sonawane

डोंबिवलीतील कुंभारखान पाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी राजकीय वातावरण चांगलेच तापले. विवाद टाळण्यासाठी पोलिसांनी शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक विकास म्हात्रे यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार असल्याने संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नजरकैद असूनही विकास म्हात्रे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उद्घाटनस्थळी पोहोचले. यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमनेसामने परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होताच काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. पुढील काही तास परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT