Sanjay Shirsat Saam Tv
Video

MLA Sanjay Shirsat : दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढीवरून हात फिरवला तर.. ; संजय शिरसाट यांचा राऊतांना इशारा

Shirsat Criticized Sanjay Raut : 'त्यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घरका ना घाट का अशी झाली आहे', असं म्हणत आज आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Saam Tv

संजय राऊत राज्य सभेचा सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांच्या हाता पाया पडत होते. यांना राज्यसभेत पाठवण ही चूक होती त्यापेक्षा संजय सावंत यांना पाठवायला हवं होतं. संजय राऊत यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घरका ना घाट का अशी झाली आहे. हा साप रोज सगळ्यांना डसतो आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते. ते शरद पवारांचे कट्टर विरोधक असताना देखील त्यांच्या कार्यक्रमांना जायचे. दाढीला हलक्यात घेऊ नका. दाढीवरून त्यांनी हात फिरवला तर डम्पिंग ग्राउंडवर बसायची वेळ येईल, असा इशाराही यावेळी बोलताना शिरसाट यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पाच तारखेला पाच वाजता आमचं सरकार येणार आहे. लग्न घटिका समीप आली आहे. या लग्नाला काही वराढी नाचण्याच्या तयारीत आहेत म्हणून टीका करत आहेत. आझाद मैदानात मोठा इव्हेंट होणार असून त्याच आमंत्रण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना देखील आहे. हा योग त्यांच्या नशिबी आला आहे ही सुवर्ण संधी त्यांनी घालवू नये, असं शिरसाट यांनी म्हंटलं आहे. तर एकनाथ शिंदे यांना अजूनही त्रास होतोय. आज ते वर्षा निवासस्थानी येतील आणि तिथे फडणवीस आणि अजित पवारांशी भेट होईल. त्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. शिंदे साहेबांना सगळे अधिकार आहेत, ते योग्य टु निर्णय घेतील, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून वाद उफाळला; एसआयटी चौकशीची मागणी

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

SCROLL FOR NEXT