नवी मुंबई महापालिकेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महापालिकेच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपुर्वक वारंवार नाकारल्याने संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते गणेश नाईक यांची गाडी अडवली. दरम्यान गणेश नाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाशी येथे विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार होता. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. त्यावरून वाद पेटलाय. गणेश नाईक या कार्यक्रमाला जाताना आक्रमक शिवसैंनिकांनी गणेश नाईक यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. शिंदेसेनेच्या कार्यकर्तांनी गाडी अडवत पालिका प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.