Maharashtra MLC election result 2026 latest updates saam tv
Video

विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? ठाकरेंचा दारूण पराभव, धक्कादायक निकाल आले समोर

Maharashtra MLC election results : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी काही मतदारसंघांत विजय मिळवला आहे. किरण सरनाईक आणि कौस्तुभ गावडे विजयी झाले असून नागपूरमध्ये सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत.

Namdeo Kumbhar

महायुतीची जोरदार मुसंडी; कोण आघाडीवर आणि कोण विजयी?

MLC Election Results 2026 : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंना मात्र जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दोन जागांवर विजयाकडे वाटचाल केली आहे. ५ मतदारसंघांमधून हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून काही ठिकाणी विजयही निश्चित झाला आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीने मुसंडी मारलीय. अमरावतीतून शिंदेसेनेचे किरण सरनाईक आणि पुण्यातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. तर नागपूरमधून सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. पुणे पदवीधरमधून मविआच्या हर्षदा देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाचे प्रतापसिंह पाटीलही पुढे आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या या निकालांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वजन वाढवण्याची चिंता संपली, डेली डाएटमध्ये समाविष्ट करा 'हे' 9 हेल्दी स्मूदीज

Maharashtra News Live Update : नंदुरबार पंचायत समितीवर संतप्त शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

Thursday horoscope: कामाच्या ठिकामी जबाबदाऱ्या वाढतील; 6 राशींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदेसेनेत गेलेल्या ६ नेत्यांची खासदारकी जाणार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टात लागणार निकाल

बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्षपणे डिवचले

SCROLL FOR NEXT