Maharashtra MLC election result 2026 latest updates saam tv
Video

शिक्षक-पदवीधरमध्ये मोठा उलटफेर! पुण्यात भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर, ५ जागांवर कोण पुढे, कोण मागे? धक्कादायक कल समोर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील मतमोजणीचे प्राथमिक कल समोर आले आहेत. नागपूरमध्ये सुधाकर कोहळे, अमरावतीत किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra MLC Election Trends : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील मतमोजणीचे कल समोर येत आहेत. नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे, अमरावतीमध्ये शिंदेसेनेचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतापसिंग पाटील, तर पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख आघाडीवर आहेत. पुण्यात स्मिता जाधव आणि सचिन सानप, तर नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी पिछाडीवर असल्याचे कल आहेत. हे प्राथमिक कल असून अंतिम निकालासाठी मतमोजणी पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.

नागपूर (शिक्षक/पदवीधर): नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ: अमरावतीत महायुतीचे (शिंदे सेना) उमेदवार किरण सरनाईक यांनी मजबूत आघाडी घेतली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघ: या मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर असून, त्यांच्या विरोधात कडवे आव्हान उभे करणाऱ्या शिंदे सेनेचे प्रा. सचिन सानप सध्या पिछाडीवर आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघ: पुणे पदवीधर जागेसाठी अत्यंत अटीतटीची लढत सुरू असून, महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी - शरद पवार पक्ष) हर्षदा देशमुख या आघाडीवर आहेत. दुसरीकडे, भाजपच्या स्मिता जाधव या सध्या पिछाडीवर पडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा पदवीधर): या मतदारसंघात महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

Vajarasana Benefits: जेवल्यानंतर वज्रासनात बसण्याचे चमत्कारिक फायदे! पचनक्रिया आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

Speeding Challan Rules: हायवेवर चालान मिळण्याचे टेन्शन खल्लास! १२० च्या स्पीडवरही दंड नाही; जाणून घ्या नवीन नियम

कोकणासाठी मोठी बातमी! चिपी-नवी मुंबई विमानसेवेला राज्य सरकारचा हिरवा कंदील, मंत्रिमंडळात घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची अजित नवले आणि शिष्टमंडळासोबत चर्चा

SCROLL FOR NEXT