Harsha Richhariya Saam tv
Video

Harsha Richhariya : ग्लॅमरस साध्वी टीकेची धनी; मॉडेल साध्वीवर शंकराचार्य भडकले,VIDEO

Harsha Richhariya Latest news : महाकुंभमेळ्यात सध्या ज्या मॉडेल साध्वीची चर्चा सुरू आहे...तिच्यावर शंकराचार्य चांगलेच भडकले आहेत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद या मॉडेल साध्वीवर का भडले पाहूयात विशेष रिपोर्ट..

Tanmay Tillu

प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभादरम्यान सर्वाधिक चर्चा होतेय ती फक्त मॉडेल अन् साध्वी हर्षा रिछारियाचीच.....प्रयागराजमधील महाकुंभात हर्षाबाबत नवीन वाद समोर आलाय..हर्षाला महाकुंभातील पहिलं अमृत स्नान करु देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झालाय. ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केलेत.

हर्षा रिछारिया निरंजनी अखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्या आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत.एका रात्रीत हर्षाचे फॉलोअर्स वाढलेत. अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभमेळ्यात सहभागी झालीये. याबाबत स्वतः हर्षानं स्पष्टीकरण दिलंय...

हर्षा रिछारिया काय म्हणाली?

मी अजूनही साध्वी बनले नाही. साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोषाख पाहून लोकांनी माझे नाव साध्वी हर्षा ठेवले. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय. हे सर्व पाहून बरं वाटतं पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही.

त्यामुळे एकीकडे साध्वी म्हणून चर्चा होणाऱ्या हर्षा रिछारियावर आता आध्यात्मिक क्षेत्रातून टीका होतेय. चांगली काय अन् वाईट काय शेवटी प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT