Shaktipeeth Expressway Saam TV Marathi
Video

Shaktipeeth Expressway : रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, हजारो शेतकरी आक्रमक; नजर फिरेल तिकडे बळीराजा

Shaktipeeth Expressway Maharashtra : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

Namdeo Kumbhar

Shaktipeeth Expressway Latest News : रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. दसरा चौकात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन केलं. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र रणशिंग फुकलं.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापुरात महामोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जमा झाले. या मोर्चात महिला शेतकरी देखील उपस्थित आहेत. सकाळी या मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चाचे नेतृत्व खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT