Mahavikas Aghadi  Saam tv
Video

Maharashtra Politics : 'मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत फाटाफूट होईल'; कुणी केला दावा? VIDEO

shahaji bapu patil : 'मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत चर्चा सुरु झाली आहे. 'मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत फाटाफूट होईल, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

Vishal Gangurde

'मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली असली, तरी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्यांना कितपत साथ देतील हे पहावे लागेल. महाविकास आघाडीत दहा ते बारा मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते आहेत. मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट होईल, असा दावा शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

'महाविकास आघाडीच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळू दे, साकडे विठ्ठल चरणी घातले आहे. यावर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर टीका करत महाविकास आघाडीत फाटाफूट होईल, असा दावा केला आहे. 'मुळात महाविकास आघाडी ही तत्वहीन आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार सोडणार नाहीत, असा टोलाही आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT