Shahad Bridge Saam Tv
Video

Shahad Bridge: महत्वाची बातमी! शहाड पूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा करा वापर

Kalyan Traffic: कल्याण- नगर मार्गावरील शहाड पुलाच्या दुरूस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More

कल्याणकरांसाठी आणि शहाड पुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कल्याण- नगर मार्गावरील शहाड पुलाची दुरावस्था झाली आहे. या पुलावर पावलोपावली खड्डे पडले आहेत. विविध राजकीय पक्षांनी संघटनांनी या खड्ड्यांविरोधात आंदोलन करत देखभाल दुरुस्तीची मागणी केली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रविवारी रात्री बारा वाजल्यापासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत शहाड पूल देखभाल दुरुस्तीसाठी अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. एकंदरीतच या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. याच पर्याय मार्गावरून वाहतूक करावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Maharashtra News Live Update: पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

SCROLL FOR NEXT