Satish Bhosale Saam Tv
Video

Satish Bhosale: प्रयागराजमधून 'खोक्या'ला कशी अटक केली? पोलिसांनी सांगितला अटकेमागचा थरार

Satish Bhosale Arrested: सतीश भोसले उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या उद्या किंवा परवा बीडमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.

Priya More

बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्रांना अमानुषपणे मारहाण करणारा आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांच्या मदतीने खोक्याला अटक केली. गेल्या ६ दिवसांपासून बीड पोलिस सतीश भोसलेचा शोध घेत होते. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती आहे.

बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी खोक्याच्या अटकेमागचा थरार सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, 'सतीश भोसले गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. पोलिस त्याचा पाठलाग करत होते. त्याचा पाठलाग करत असताना आम्हाला प्रयागराजमध्ये तो असल्याचे कळाले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या संपर्कात राहून आम्ही प्रयागराजमधून त्याला अटक केली.'

'सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल आहे. शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. चकलांबा पोलिस ठाण्यात त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल आहे. तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केलेला आहे. अटकेनंतर आता खोल्या बीडमध्ये उद्या किंवा परवा आणण्यात येईल.', अशी माहिती देखील पोलिस अधीक्षकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बंडखोर खासदारांनी केलेले आरोप खोटे : आमदार संजय देरकर

पोट सुटलंय? जाडे दिसताय? मग आजपासूनच घरच्या घरी सुरू करा 'हे' 5 योगा

मी धर्म संकटात, पाऊल चुकीचे वाटतंय, पण...; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

Operation Tiger : ठाकरेंचे 'ते' २ खासदार फुटायला तयारच नव्हते; दिग्गज नेत्यानं खेळला मास्टरस्ट्रोक अन् स्क्रिप्ट बदलली

Operation Tiger : २१ जूनला राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT