Party workers celebrate as exit polls predict BJP’s strong performance in Maharashtra Zilla Parishad elections. saam tv
Video

Zilla Parishad Election Exit Poll: राष्ट्रवादीचा गड भाजप हिरावणार; झेडपीमध्ये कमळ फुलणार

Maharashtra ZP Elections Exit Poll: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील जिल्हा परिषदेत कमळ फुलणार आहे.

Bharat Jadhav

  • राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान

  • ७४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात

  • एक्झिट पोलनुसार भाजपला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान झालं. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 7438 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आलेत. साम टीव्हीकडून करण्यात आलेल्या या एक्झिट पोलनुसार सातारा जिल्ह्यात भाजपकडे सत्ता जाऊ शकते. सातारा जिल्ह्यातील ६५ जिल्हा परिषद गट आणि ३३० पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक हाती सत्ता होती. मात्र यंदा भाजप मुसंडी मारत सत्ता मिळवू शकते असा अंदाज आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गटाने युती करत निवडणूक लढवली होती. पण भाजप बाजी मारत येथे बहुमत मिळवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT