Mukhyamantri Yojanadut Saam Tv
Video

Mukhyamantri Yojanadut: खुशखबर! राज्यातील ५० हजार तरूणांना मिळणार रोजगार; कसा आणि कुठे? पाहा VIDEO

Maharashtra Government New Scheme Appoint 50 thousand Youth: राज्यातील तरूणांसाठी खुशखबर आहे. सरकार आता ५० हजार तरूणांना नोकरी देणार आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यातील तरूणांसाठी महत्वाची योजना आहे. राज्यातील ५० हजार तरूणांना आता रोजगार देण्यात येणार आहे. सरकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी ५० हजार तरूणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील सहा महिन्यांकरिता ५० हजार तरूणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या ५० हजार तरूणांना दर महिन्याला १० हजार पगार दिला जाणार आहे. पुढील तीन महिन्यात सरकारच्या या नव्या योजनेसाठी साधारण तीनशे कोटी रूपयांच्या खर्चाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

परंतु या सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवाराचं वय १८ ते ३५ वर्ष असणं आवश्यक आहे. तर तो तरूण कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं देखील अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने तरूणांना यासाठी अर्ज करता येणार आहे. जिल्हा अधिकारी या तरूणांची नेमणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT