Ambabai- Jyotiba Temple Saam Tv
Video

Ambabai- Jyotiba Temple: महिलांनी साडी अन् चुडीदार, तर पुरूषांनी...; अंबाबाई-ज्योतिबा मंदिरात ड्रेसकोड

Kolhapur Temple News: कोल्हापुरमधील अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये यापुढे ड्रेसकोड असणार आहे. मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिलांनी आणि पुरूषांनी या मंदिरात जाताना कोणते कपडे परिधान करावेत हे घ्या जाणून...

Priya More

रणजित माजगांवकर, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय परंपरेला शोभेल अशा पद्धतीची वस्त्र धारण करूनच यावीत, असे पत्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जाहीर केले आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यापूर्वीच ड्रेस कोड संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. गेली अनेक महिने भाविक दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर आणि कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अनेक भाविक पाश्चात्य संस्कृतीचे ड्रेस तसेच तोकडे कपडे घालून येत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने भाविकांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. तसेच मंदिरात येत असताना पुरुषांनी पूर्ण कपडे तसेच महिलांनी साडी किंवा चुडीदार अशा पद्धतीच्या वस्त्रांचा वापर करावा असे म्हटले आहे.

दरम्यान मंदिर परिसरात तोकडे कपडे घालावे की पूर्ण भारतीय पोशाख परिधान करून मंदिरात यावे ? यासंदर्भात साम टीव्हीच्या वतीने काही भाविकांना प्रश्न विचारण्यात आलेत. यावेळी भाविकांनी मंदिरात येत असताना भारतीय संस्कृतीला शोभतील असेच कपडे परिधान केले पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत बोलताना दिलेल्या आहेत. आपण मंदिरात देवदर्शनासाठी येत असतो, पिकनिकला येत नसतो. इतर राज्यातील मंदिरात जाताना आपण संस्कृतीला शोभतील असेच कपडे घालतो, मग आपल्या मंदिरांमध्ये सुद्धा आपण याचं भान ठेवूनच प्रत्येकाने मंदिरात येताना ही आचारसंहिता पाळणे गरजेचे असल्याचेही भाविकांनी सांगितलं आहे.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आणि दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी अनावधानाने जर तोकडे कपडे घातले असतील, तर त्यांना मंदिर परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये सोहळे वापरण्यासाठी मिळणार आहे. नाम मात्र दरामध्ये भाविकांनी ते सोहळे नेसून मगच मंदिरात प्रवेश करावा असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ड्रेस कोड संदर्भात केलेल्या नियमावलीला आता महाराष्ट्रातील भाविक कसा प्रतिसाद देतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आणखी एका भोंदू बाबाचा घाणेरडा प्रकार; महिलेकडून विनयभंगाचा आरोप

Friday Horoscope: आजच्या दिवशी अनावश्यक खर्च टाळला पाहिजे; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहि‍णींवर २१ हजार कोटींचा खर्च; २० महिन्यापासून ₹१५०० घेतले

Fridge Cleaning Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधून दुर्गंधी येतेय? स्वयंपाकघरातील या गोष्टींनी करा स्वच्छ

Lack of sleep health risks: फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

SCROLL FOR NEXT