Saquib Nachan, the terror accused linked with ISIS and Mumbai blasts, died at Deen Dayal Upadhyay Hospital after suffering a stroke in Tihar Jail.  saam tv
Video

Saquib Nachan: मुंबईत दोन बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू|VIDEO

Saquib Nachan: मुंबई बॉम्बस्फोट व इसिस मॉड्युल प्रकरणातील आरोपी साकीब नाचनचा तिहार तुरुंगात ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. एनआयएने डिसेंबर 2023मध्ये त्याला ठाणे जिल्ह्यातील पडघ्यातून अटक केली होती.

Omkar Sonawane

देशातील अनेक बॉम्बस्फोटाचा आरोपी सकीब नाचनचा मृत्यू झाला आहे. ISIS महाराष्ट्र दहशतवादी माॅड्युल प्रकरणातील प्रमुख आरोपी साकीब नाचनला सोमवारी ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार नाचनची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिहार तुरुंग अधिकऱ्यांनी त्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती दिली होती. इसिस माॅड्युल प्रकरणात एनआयने डिसेंबर 2023मध्ये ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात साकीबसह त्याच्या अनेक साथीदारांना पडघ्यातून अटक केली होती. तीन दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. आज त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT