Manoj Jarange SaamTv
Video

Manoj Jarange : खंडणी आणि हत्येचे आरोपी एकच; कराडला मकोका लावल्यावर जरांगेंचा मोठा दावा | VIDEO

Manoj Jarange Statement On Walmik Karad : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला आज मकोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आता यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला आज पोलिसांनी मकोका लावला आहे. तसंच त्याला कोर्टात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. त्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी एकच असल्याचा दावा यावेळी जरांगे यांनी केला आहे. एका माणसासाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, जेव्हा खंडणीतले आणि खुणातले आरोपी यांच्यावरती ३०२चा गुन्हा दाखल करता. तेव्हा या आरोपींना सांभाळणारे कोण? त्यांना गाड्या पुरवणारे कोण? पैसे पुरवणारे कोण? या सगळ्यामागे शंभर दीडशेजण असायला हवे. ही सगळी टीम मुख्यमंत्र्यांनी धरली पाहिजे. एका आरोपीसाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं जरांगे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT