Ajit Pawar On Santosh Deshmukh Case saam tv
Video

Ajit Pawar News: धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजित पवारांसमोरच मस्साजोग गावकऱ्यांच्या घोषणा, VIDEO

Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोरच रोष व्यक्त केला. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा, अशा घोषणा गावकऱ्यांनी पवार यांच्यासमोरच दिल्या.

Nandkumar Joshi

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अशा घोषणा मस्साजोग येथील ग्रामस्थांनी अजित पवार यांच्यासमोरच दिल्या. अजित पवार यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आरोपींना सोडणार नाही, असा शब्दच अजित पवारांनी देशमुख कुटुंबीयांना दिला.

अजित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अधिवेशन संपल्यानंतर पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला. या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या सर्व प्रकरणावर आमचं बारकाईनं लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच आश्वासित केल आहे की यावर कारवाई होणार करण्यात येईल. या प्रकरणात आम्ही दोन प्रकारे चौकशी करत आहोत. कोणाचाही दबाव नको म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही चौकशी करत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

या प्रकरणात काही शंका-कुशंका राहू नयेत म्हणून आम्ही दुसरी न्यायालयीन चौकशी देखील करत आहोत. अशा पद्धतीने चौकशी होत असताना कुठेही त्यामध्ये त्रुटी राहणार नाहीत, या प्रकारची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. हे मी आपल्या सर्वांना आश्वासित करत आहे. सरकारच्या वतीने मी आपल्याला हे सांगत आहे, असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT