Santosh Deshmukh case update saam tv
Video

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट | VIDEO

sarpanch santosh deshmukh killing Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

Saam Tv

योगेश काशिद, बीड

sarpanch santosh deshmukh killing Case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. सीआयडी आणि एसआयटीनं संयुक्तपणे या प्रकरणात दाखल तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि ॲट्रॉसिटी प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले असून, दोषारोपपत्र बीड न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

या दोषारोपपत्रात संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब देखील नोंदवण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे धनंजय देशमुख, अश्विनी देशमुख यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. जवळपास १४०० पानांचे हे दोषारोपपत्र आहे.

८० दिवसांत दोषारोपपत्र

संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी व ॲट्रॉसिटी प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. याबद्दल आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले. घटना घडल्यानंतर ८० दिवसांत हे आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे आरोपींना यात जामीन सुद्धा मागता येणार नाही. हे अतिशय चांगले काम झाले असून, याबद्दल मी गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असे सुरेश धस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

प्राध्यापकासोबत नाव जोडले, मित्र-मैत्रिणींकडून अपमान सहन झाला नाही; आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT