Devotees offer floral tribute and participate in bhajans as Sant Gajanan Maharaj Palkhi arrives in Dharashiv during its journey to Pandharpur. saam tv
Video

Ashadh Wari: ५६ वर्षांची परंपरा अखंडित! गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये भक्तीभावात दाखल|VIDEO

Sant Gajanan Maharaj Palkhi welcome: शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे धाराशिवमध्ये भक्तिभावात स्वागत. फुलांची उधळण, भजन, कीर्तन आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने पालखीचे आगमन झाले.

Omkar Sonawane

शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज धाराशिव शहरात जंगी स्वागत करण्यात आले. गेल्या ५६ वर्षांपासून ही पवित्र परंपरा अखंडितपणे सुरू असून, यंदाही पालखीने भक्तीमय वातावरणात शहरात आगमन केले.

गेल्या तीन दिवसांपासून संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात जात आहे. आज ती धाराशिव शहरात दाखल झाली आणि शहरातील लेडीज क्लब मैदानावर तिचा मुक्काम आहे. शहरात पालखीच्या आगमनानंतर भाविकांनी फुलांची उधळण, भजन-कीर्तन, ढोल-ताशा पथकांसह उत्स्फूर्त स्वागत केले. पालखी सोहळ्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी "गण गण गणात बोते" चा जयघोष केला. वातावरण भक्तिरसात न्हालं होतं. अनेक ठिकाणी पाणपोया, फलाहार व विश्रांती केंद्रं उभारण्यात आली होती.

ही पालखी यात्रा शेगावहून सुरू होऊन विविध गावांतून मार्गक्रमण करत पंढरपूरच्या दिशेने जाते. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत असून, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य याचं प्रतीक असलेल्या या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT