Jejuri Temple Saam TV
Video

Jejuri : जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी | VIDEO

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी आज जेजुरी नगरीत दाखल होणार आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जेजुरी गडावर जमले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत मोठ्या भक्तिभावात दाखल होणार आहे. आज पहाटेपासूनच लाखो वारकरी खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर जमले आहेत. शैव आणि वैष्णव परंपरेचा अनोखा संगम आज जेजुरीत खंडोबा गडावर पाहायला मिळत आहे.

ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खंडोबा गडाची भक्तिमय दृश्यं कैद होत असून, गडावरील रंगांची उधळण, गुलालाची उधळपट्टी, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिपाठ, अभंग आणि फडांचे थरार अंगावर रोमांच आणत आहेत.वारकरी भजनात, अभंगगायनात तल्लीन झाले असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यात्रा पुढं चालली आहे असा जयघोष करत भक्तीमय वातावरणात सोन्याच्या जेजुरीत पोहोचत आहे.

वारी परंपरेतील हा क्षण म्हणजे श्रद्धेचा, भक्तीचा आणि महाराष्ट्राच्या अध्यात्मिक संस्कृतीचा एक सुवर्ण अध्याय आहे. संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT