न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. ते सध्याचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची जागा घेतील. संजीव खन्ना हे 51 वे सरन्यायाधीश आहेत. ते सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत आणि ते 11 नोव्हेंबर रोजी सीजीआय म्हणून शपथ घेतील. याआधी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी 8 नोव्हेंबर 2022 रोजी सीजीआय म्हणून शपथ घेतली होती.
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती देताना सांगितले की, संजीव खन्ना यांची सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती खन्ना हे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सीजीआय म्हणून काम करतील आणि त्यानंतर 13 मे 2025 रोजी त्यांना पदमुक्त केले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.