Sanjay Shirsat. 
Video

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Sanjay Shirsat's controversial statement : संजय शिरसाट यांनी "सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय" असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानावर टीका होत असून, सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली.

Namdeo Kumbhar

महायुतीमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्याची मालिका थांबायचे नाव घेत नाही. वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटे यांना मंत्रिपद सोडावे लागले. पण पण ही मालिका काही थांबायचे नाव घेईना. मेघना बोर्डीकर यांच्यानंतर शिरसाट यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले. वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटी असे कितीही पैसे मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे. आपल्या बापाचं काय जातंय, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.

आमदार मिटकरींनी दिलं स्पष्टीकरण..

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी स्पष्टच स्पष्टीकरण दिलंय.. "सामाजिक न्यायभवनाच्या वस्तीगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे... आपल्या बापाचं काय जातंय" असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलं होतंय. त्यांच्या विधानाचा परत पराचा कावळा केला गेला असल्याचे आमदार मिटकरी म्हटले.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार जरी असलं तरी महायुतीच्या एका बड्या नेत्याने सरकारला घरचा आहेर दिलाये.. सरकारमधीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मिटकरी आपला अनुभव सांगत सरकारला घरचा आहेर दिलाय. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेला विद्यार्थ्याला वस्तीगृहाचे अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते ऍडमिशन देत नाहीत, अर्थातच सहकार्य करत नसल्याची खंत मिटकरींनी बोलून दाखवली.. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर त्यांनी ही खंत व्यक्त केलीय. अकोल्यातल्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मिटकरींनी आपला अनुभव सांगितलाय. या अधिकाऱ्यांमुळे सामाजिक न्याय विभाग बदनाम होत असल्याचेही ते म्हटले. त्यामुळे आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती मिटकरींनी केली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT