Nashik news  saam tv
Video

Maharashtra Politics: सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही-संजय राऊत|VIDEO

Political Storm in Nashik: उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नाशिकमध्ये मोठे राजकीय खलबत झाले असून ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

नाशिक येथील ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर सर्वांच्याच राजकीय भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट राजकीय नसून कामगारांचे काही प्रश्न होते यामुळे ही भेट घेतली असे बडगुजर यांनी स्पष्ट केले होते. तर पक्षात संघटनात्मक बदल करत असताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे 10 ते 12 जण नाराज आहे असा गौप्यस्पोट बडगुजर यांनी केल्यानंतर ते नाराज असल्याचे दिसले.

याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, बडगुजर म्हणजे शिवसेना नाही ते आमचे सहकारी आहे ते सध्या शिवसेनेत आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, असे म्हणत काही वेळातच नाशिकमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे पत्रकार परिषद सुरू असताना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांनी फोन करून सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केले असल्याचे सांगितले. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

America Attack On Iran: अमेरिकेचा इराणवर आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला, 'ऑइल हब' असलेले खार्ग बेट उद्ध्वस्त

Face Wash Uses Tips: फेसवॉशने चेहरा कसा धुवावा?

Nashik Tourism : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

SCROLL FOR NEXT