Saam Tv Impact Saam Tv
Video

Saam Tv Impact: हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाचा माज उतरला; पोलिसांच्या दणक्यानंतर रडत रडत मागितली माफी, VIDEO

police Action against goon collecting installments in Pune : पुण्यात एका हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाचा माज उतरल्याचं दिसतंय. त्याने पोलिसांच्या दणक्यानंतर रडत रडत माफी मागितल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्याच्या पिंपळे गुरवमध्ये एक गुंड हप्ता वसूल करत होता. हा व्हिडिओ हाती लागल्यानंतर सामटीव्हीने यासंदर्भात बातमी दाखवली होती. त्यानंतर आता या गावगुंडावर पोलिसांनी कारवाई केलीय. सामच्या बातमीनंतर पोलिसांनी या गावगुंडाला चांगलाच धडा शिकवलाय. नकुल गायकवाड, असं या गावगुंडाचं नाव आहे. एका दुकानदाराला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी करत तो हप्ता वसुली करत असल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी संबंधित गाव गुंडाला चांगला धडा शिकवलाय.

सामटीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी या गुंडावर कारवाई केलीय. मी काल एका टपरीवाल्याला मारलं होतं, त्याच्याकडून पैसे घेतले होते. याबद्दल माफी मागतो, असं म्हणत या गुंडानं चूक मान्य केलंय. पोलिसांनी मात्र या गुंडाचं मुंडन करत त्याला चांगलाच प्रसाद दिलाय. या तरूणाने आधी गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्याला चांगलाच दणका दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT