Sangli bag snatching case  saam tv
Video

Sangali News: दिवसाढवळ्या धूम स्टाईल चोरी; ४० तोळ्यांचे दागिने लंपास,चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद|VIDEO

Sangli gold heist 40 tola jewellery stolen: सांगली येथील ध्यानचंद्र सकळे यांनी घरी लग्न होते म्हणून 40 तोळे सोने काढले होते. ते परत ठेवण्यासाठी ते गेले असता...

Omkar Sonawane

सांगली मध्ये भर दिवसा धूम स्टाईलने चोरट्यांनी 40 तोळे सोन्याची दागिने लुटले आहेत. शहरातील पुष्पराज चौकातील कर्मवीर पाटील पतसंस्थेच्या समोर एका वृद्धाचे ४० तोळे सोन्याची दागिने असलेली बॅग लंपास केली आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

धनचंद्र भाऊराव सकळे वय 65 हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत. कर्मवीर पतसंस्थेचे ते जुने खातेदार आहे. संस्थेत त्यांनी दागिने ठेवण्यासाठी लॉकर घेतला होता. त्यांच्या घरात लग्न असल्यामुळे त्यांनी दागिने घरात आणले होते. त्यानंतर दागिने परत संस्थेत ठेवण्यासाठी ते आपल्या गाडीतून निघाले आणि पतसंस्थेजवळ त्यांनी आपली गाडी थांबवली.

गाडीचा दरवाजा उघडून ते बाहेर पडले. तेवढ्यात मागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील बॅग हिसकाऊन धूम ठोकली. याबाबत सकळे यांनी सांगली येथील विश्रामबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

LPG Cylinder Price: ग्राहकांना आता मिळणार १० किलोचा सिलिंडर; डिलीव्हरीही होईल झटपट, जाणून घ्या किती असेल किंमत?

SCROLL FOR NEXT