Sandip Deshpande News: Saam tv
Video

Sandip Deshpande News: महिला अत्याचारासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; जितेंद्र आव्हाड आणि मनसेमध्ये जुंपली,VIDEO

Sandip Deshpande News In marathi : महिला अत्याचारासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मनसे नेत्याने जितेंद्र आव्हाड यांची वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आमदार जिंतेंद्र आव्हाड यांची वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यामधील संवादाची ही जुनी क्लिप असल्याचे सांगत संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट असल्याने त्यांनी माझा आवाज काढल्याचा संशय जिंतेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. या क्लिपमुळे जितेंद्र आव्हाड आणि मनसेमध्ये जुंपल्याचं समोर आलं आहे.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यामधील ही जुनी क्लिप वादग्रस्त असल्याचे बोललं जात आहे. महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांचे महिलांबद्दल मत बघा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी महिला सुरक्षेवरून कार्यकर्त्यांना शपथ दिली होती. त्यावरून शपथ घेतली होती ना? असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

Fact Check : सोनं झाडाला लागणार? कुठे सापडलंय सोन्याचं झाड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Wall Stain: डाग अच्छे है! मुलांनी भिंतीवर चित्र काढून भिंती खराब केल्या? 'या' सिंपल ट्रिक्सनं होतील साफ

SCROLL FOR NEXT