Samruddhi Highway Accident Video Saam Tv
Video

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातापूर्वीचा थरारक VIDEO समोर, ७ जणांनी गमावले प्राण

Samruddhi Highway Accident Video: समृद्धी महामार्गावर वर्ध्याजवळ भीषण अपघात झाला. दुर्गादेवीची मूर्ती घेऊन येताना भाविकांना कंटेनरने चिरडलं. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला.

Priya More

वर्ध्यातील धामणगावजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. अपघातग्रस्त वाहनात बसलेले दुर्गादेवी मंडळाचे कार्यकर्ते समृद्धीवर मागून येणाऱ्या गाडयांना हात दाखवताना दिसत आहे. वाहनात बसलेल्या एका तरुणाने हा व्हिडीओ काढला होता.

नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणण्यासाठी हे सर्व भक्त शेगाव येथे गेले होते. मूर्ती घेऊन परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. भरधाव कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडले. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटना प्रकरणी विनर्स अकॅडमी सील; आळंदी नगरपरिषदेची कारवाई

राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला; आता कुठून निघणार, कुठे धडकणार?

प्रदीप पूर्णेकर हत्येपूर्वीच्या दोन दिवसांत काय घडलं? राम पूर्णेकरांच्या जबाबातून महत्त्वाचा खुलासा

Dark Chocolate vs Regular Chocolate: डार्क चॉकलेट की चॉकलेट्स आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर? वाचा...

Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?

SCROLL FOR NEXT