swarajya Party Protest at SARTHI office saam tv
Video

VIDEO : पुण्यातील 'सारथी' कार्यालयात स्वराज्य पक्षाचं आक्रमक आंदोलन, काय आहेत मागण्या?

swarajya Party Protest at SARTHI office in Pune : मराठा समाजाच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत ऑफिस सोडणार नाही, असं म्हणत स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयात आंदोलन केलं.

Nandkumar Joshi

सचिन जाधव | साम टीव्ही, पुणे

प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयात संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आक्रमक झाला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट सारथीच्या कार्यालयावर धडकले.

सारथी संस्थेत अनेक प्रलंबित मागण्यांसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने अनेक वेळा निवेदने दिली होती. काही दिवसांपूर्वीच म्हणजे १३ जून रोजी सारथी संस्थेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. त्यावेळी पुढील दहा दिवसांमध्ये संचालक मंडळाची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक काकडे यांनी दिले. पण अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळं स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट पुण्यातील सारथीचे कार्यालय गाठून आंदोलन केले. मराठा समाजाचे तरुण आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून जाणार नाही, अशी ठाम भूमिका सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT