Sambhajiraje And Sanjay Raut SaamTv
Video

SambhajiRaje Chhatrapati : जरांगेंची विधानसभेतून माघार; संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले.. | VIDEO

Manoj Jarange patil News : विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संभाजीराजे छत्रपती आणि संजय राऊत यांनी देखील जरांगे यांच्या भूमिकेवर स्पष्टच भाष्य केलं आहे.

Saam Tv

मनोज जरांगे यांनी कायम समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच ते आपली भूमिका स्पष्ट करत असतात, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याबद्दल बोलताना संभाजीराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांच्या भूमिकेबद्दल खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 'सर्व बाजूंनी विचार करूनच मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करतात. त्यांनी आजवर कायम समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीतून माघार घेताना देखील त्यांनी निश्चितच पूर्ण विचार करूनच आपली भूमिका स्पष्ट केली असेल. त्यांच्याशी बोलल्याशिवाय याबद्दल मला प्रतिक्रिया देता येणार नाही', असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटलं आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मनोज जरांगे यांचा संघर्ष सातत्याने सुरू आहे. हा संघर्ष त्यांच्या समाजाच्या विकासासाठी व उद्धारासाठी आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली हे मान्य केले पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी एकसंधपणे उभा आहे हे ही आपण मान्य केले पाहिजे. निवडणुकीविषयी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही स्वतः त्यांचा लढा राजकीय मानत नाही. हा सामाजिक लढा आहे. ही एक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे जरांगे यांनी कोणती भूमिका घ्यावी व कशा प्रकारे घ्यावी याचे मार्गदर्शन आम्ही करणार नाही. पण त्यांच्या लढ्याला आमचे कायम पाठबळ असेल,' असं राऊत यांनी याविषयी भाष्य करताना म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT