Sambhaji Raje News SaamTv
Video

Sambhaji Raje News : संतोष देशमुख हत्याप्रकरणी संभाजीराजेंचा संतप्त सवाल, म्हणाले... |VIDEO

Santosh Deshmukh Death Case News : माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Saam Tv

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून माजी खासदार संभाजी राजे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला केला आहे. वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही? असा संतप्त सवाल संभाजी राजे छत्रपतींनी उपस्थित केला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची पंधरा दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यातील प्रत्येक भागातून संतत्प प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी देशमुख यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं देखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विरोधकांकडून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. आज बीड जिल्ह्यात या प्रकरणी प्रशासनाच्या विरोधात सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. तत्पूर्वी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अद्याप वाल्मिक कराडला अटक का झाली नाही? असा संतप्त सवाल विचारात वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही हे स्वत: पंकजा मुंडे यांनी भर सभेत सांगितलं आहे. मग धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात संभाजी राजे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT