Prashant Koratkar Saam tv
Video

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; कुणी केली मागणी?

Prashant Koratkar News : प्रशांत कोरटकरला कठोरातील कठोर शिक्षेची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

Saam Tv

प्रशांत कोरटकरच्या तेलंगणातून मुसक्या आवळल्या आहेत. कोरटकरला कोल्हापुरात आणलं जाणार आहे. प्रशांत कोरटकरला अटकेचा थरार तेलंगणामध्ये घडला. आता प्रशांत कोरटकरवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत वाईट, वादग्रस्त भूमिका होती. त्याचं वक्तव्य हा खरा अर्बन नक्षलवाद आहे. समाजात राहून समाजातच सामाजिक विष पसरवणे हा खरा गुन्हा आहे. कोरटकरला ज्यांनी ज्यांनी पळून जायला मदत केली, ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना 'सह आरोपी' करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडची राज्य सरकारकडे आहे. कोरटकरच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे. असं महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमींना वाटतं, म्हणून कोरटकरला सुट्टी देऊ नये. सरकारने किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कोरटकरला वाचवण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्न करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. म्हणून राष्ट्रपुरुषांची बदनामी करून पळून जाणे हा राष्ट्रद्रोह आहे. म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT