Sambhaji Bhide controversy saam tv
Video

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या तोंडाला काळे फासणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Sambhaji Bhide Latest News : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे, असं वक्तव्य करून संभाजी भिडे पुन्हा वादात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून, तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला आहे.

Nandkumar Joshi

किल्ले रायगडावर ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा राज्याभिषेक सोहळा बंद करावा, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिलाय. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध केला जात आहे.

दुसरीकडे, संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असं संघटनेनं म्हटलं आहे. संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध आहे. 6 जून ही तारीख 'नामशेष' करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्रा चावल्यामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे, असंही संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Encounter : आतापर्यंतचा सर्वात मोठा एन्काउंटर, ६४ गुन्हेगारांचा खात्मा, स्पेशल फोर्सची मोठी कारवाई

November Travel: नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हल प्लॅन करताय? फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत 'या' सुंदर रोमँटिक ठिकाणी करा ट्रिप

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

Nilesh Ghaiwal: गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT