दहीहंडी उत्सवात बायका नाचवणारे देशद्रोही असल्याची टीका संभाजी भिडेंनी केली.  saam TV
Video

Sambhaji Bhide : दहीहंडी उत्सवात बायका नाचवणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची खरमरीत टीका

Sambhaji Bhide calls dance performances at Dahi Handi anti national : दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात नृत्यांगणा आणल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून टीका होत असतानाच, संभाजी भिडेंनी जोरदार प्रहार केला आहे. दहीहंडी उत्सवात बायका नाचवणारे देशद्रोही आहेत, असे ते म्हणाले.

Nandkumar Joshi

दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बायका नाचवणारे हे देशद्रोही आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांकडून काही ठिकाणी नृत्यांगणांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी अश्लिल नृत्य आणि शेरेबाजीही करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचे बरेचसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दहीहंडीसारख्या उत्सवात नृत्यांगणांना नाचवणे योग्य आहे का, असा सवालही नेटकऱ्यांकडून करण्यात आला होता. याच मुद्द्यावर संभाजी भिडे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दहीहंडीच्या सणाच्या कार्यक्रमात बायका नाचवणारे हे देशद्रोहीच आहेत, असे ते म्हणाले.

हा मूर्खपणा असून, असले प्रकार करणारे देशद्रोही आहेत, असे संभाजी भिडे म्हणाले. सध्याच्या डीजे, डॉल्बीच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. संबंध देशाने डॉल्बी आणि डीजे फेकून दिले पाहिजेत. ते कायमस्वरुपी बंद झाले पाहिजेत. सण-उत्सवांमध्ये त्याचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT