Bhandara Saam TV
Video

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील साकोलीचा मुख्य तलाव फुटला, सर्वत्र जलमय परिस्थिती | VIDEO

Sakoli : भंडाऱ्याच्या साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव फुटला आहे. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता. प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केल्यानं आज पहाटे हा तलाव फुटला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडाऱ्याच्या साकोली शहरातील जुन्या भागात असलेला मुख्य तलाव फुटला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता. साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी यापूर्वीच तलाव फुटण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होत आहे.तलाव फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी परिसरातील शेतशिवारात शिरलं असून सगळी शेती खरडून निघाली आहे.सध्या संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे साकोली ते चंद्रपूर मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने मदतकार्य सुरू करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT